Bluepad | Bluepad
Bluepad
‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!
P
Preeti Gawali
13th May, 2022

Share

तुम्ही झपाटलेला सिनेमा पाहिला असेलच. त्यातल्या तात्या विंचूच्या भयानक करामती पाहून भीतीने सर्रकन अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. रुपेरी पडद्यावरचा हाच भीतीचा अनुभव प्रत्यक्षात देणारी काही ठिकाणं महाराष्ट्रात आहेत. तुम्हालाही असे भीतीदायक अनुभव घ्यायचे असतील तर या पाहुयात, महाराष्ट्रातील ती कोणकोणती भीतीदायक ठिकाणं आहेत ती.

डिसूझा चाळ, मुंबई

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!


मुंबईतील माहीमच्या डिसूझा चाळ परिसरातील एका विहिरीला ‘पछाडलेली विहीर’ म्हणतात. पाणी भरत असताना एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. विहिरीजवळ त्या महिलेचे भयानक आणि भेसूर रूप पाहिल्याचा दावा अनेक लोक करतात.

जॉन्सन अँड जॉन्सन रोड, मुंबई

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नल हे विचित्र गोष्टी घडणारं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पांढऱ्या साडीतील एक महिला या गल्लीत राहते आणि विशेषत: अमावस्येच्या रात्री अनेक अपघातांना कारणीभूत ठरते. बहुतेक अपघात प्राणघातक असले तरी, जे वाचले ते संगत्तात की रस्त्यात अचानक एक पांढरी साडी नेसलेली महिला आली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाला. या व्यतिरिक्त त्यांना फारसं काही आठवत नाही!

मुकेश मिल्स, मुंबई

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

ही मिल ८० च्या दशकात बंद पडली. आता भुताच्या कथांनी ह्या जागेभोवती फेर धरला आहे. या मिलच्या परिसरात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा शूटींगदरम्यान एका अभिनेत्रीच्या अंगात कसलासा संचार झाला आणि ती मर्दानी आवाजात बोलू लागली. निर्जन आणि उध्वस्त, मुकेश मिल्स हा हॉरर चित्रपटांसाठी तयार केलेला सेट आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते सूर्यास्तानंतर मिलला पछाडलेले मानून येथे काम करण्यास नकार देतात.

वृंदावन सोसायटी, ठाणे

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

वृंदावन सोसायटीतील एका इमारतीत एकदा कधीतरी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून या भागात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांना विचित्र गोष्टी आणि घडामोडींचा अनुभव आलेला आहे. एकटे असताना त्यांच्या तोंडावर कोणी तरी जोरात चापट मारून जातं. शिवाय रात्रीच्या वेळी गस्त घालताना भुताटकीची कुजबुज देखील ऐकू येते!

शनिवारवाडा, पुणे

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

असे म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री हे ठिकाण खूप पछाडलेले असते. नारायणराव पेशव्यांचा वयाच्या १३ व्या वर्षी गार्द्यांनी खून केला. तेव्हा त्यांनी आपले काका रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशवे यांना हाक मारली, “काका मला वाचवा". हीच हाक खास करून पौर्णिमा अमावस्येच्या मध्यरात्री ऐकू आल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

पारशी कब्रस्तान, नागपूर

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

नागपुरातील झपाटलेल्या ठिकाणाबद्दल स्थानिकांना विचारल्यास, पारशी स्मशानभूमी हे नाव सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळेल. या ठिकाणी गेल्यानंतर पुढील एक आठवडाभर लोक आजारी पडून बिछान्याला खिळल्याचं सांगितलं. कारण इथे भयानक आवाज ऐकू येतात आणि विचित्र अशा मानवी आकृत्या लोकांचा पाठलाग करतात असं इथे गेलेल्या लोकांनी सांगितलं आहे. जर तुम्ही कधी नागपूरला भेट दिली आणि झपाटलेला अनुभव
घ्यायचा असेल तर हे योग्य ठिकाण आहे.

झपाटलेले घर, पुणे

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

पुण्यात वॉटर ऑफिसच्या समोर आणि गार्डन बारच्या बाजूला एक झपाटलेले घर आहे. हे भितीदायक आणि विचित्र ठिकाण त्याच्याबद्दलच्या अनेक कथांमुळे प्रसिद्ध आहे. खूप वर्षे तिथे कुणीच वास्तव्य केलेलं नाही, असे म्हटले जाते.

झपाटलेली विहीर, अहमदनगर

बेलवंडी कोठार येथे मंदिराला लागून ही विहीर आहे. येथील गावकऱ्यांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तरीही ते या विहिरीचे पाणी वापरत नाहीत कारण ही विहीर पछाडलेली आहे. तिचं पछाडलेपण सांगणाऱ्या विविध भयानक कथा सांगितल्या जातात.

राज किरण हॉटेल, लोणावळा

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

या हॉटेलच्या तळमजल्यावर एक खास खोली आहे, जिथे पाहुणे झोपले असताना त्यांच्या चादरी ओढल्या गेल्याचे अनुभव लोकांनी सांगितले आहेत. काही जणांनी अंधाऱ्या मध्यरात्रीला त्यांच्या पायाशी निळ्या रंगाचा प्रकाश पाहिल्यामुळे ते पुन्हा झोपूच शकले नाहीत. त्या खोलीत राहिल्यानंतर या लोकांनी मानसिक उपचार करून घेतले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्ग, कसारा घाट

‘ही’ आहेत महाराष्ट्रातली काही भीतीदायक ठिकाणं….!!!!

कसारा घाटातून जाणार्‍या मुंबई-नाशिक महामार्गावरील एक विशिष्ट भाग अनेक अलौकिक घटकांनी पछाडलेला असल्याचे म्हटले जाते. लोकांनी एक डोके नसलेली महिला पाहिल्याचे सांगितले आहे, जी अचानक वाहनासमोर येते, ज्यामुळे असंख्य अपघात होतात.
वर सांगितलेल्या काही जागा ह्या तिथे गेलेल्या लोकांच्या अनुभवावरून तर काही जागा एकाचं दोन करून कानोकानी होऊन भीतीदायक ठरल्या आहेत. पण इथे गेलेल्या लोकांचा अनुभव पूर्णपणे वैयक्तिक असतो. अनेकांना असे अनुभव येतही नाहीत. त्यामुळे ह्या जागांचा उल्लेख करण्याचा उद्देश अंधश्रद्धा किंवा भीती पसरवण्याचा नाही आणि त्या जागेची बदनामी करण्याचा तर अजिबात नाही. केवळ माहिती देणे एवढाच याचा उद्देश आहे. तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर कमेंट करून नक्की शेअर करा.

506 

Share


P
Written by
Preeti Gawali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad