तू कधी येतोस हळूवार तर कधी भन्नाट वार्या वर होऊन स्वार.
येणयाने तुझ्या धूंद होते मी, आठवणीच्या झुल्यावर मन होते स्वार.
तुझ येण तस कधीच नक्की नसत्,तसच काहीस त्याच ही होतं.
मि एकटीच झेलत राहते पावसाचे तुषार,तो येता येता मग तुझ जाण होतं.
चिम्ब चिम्ब तुझ्यात भिजुन सुद्धा मन असे शुष्क का?
देवून तुला सगळ काहि पुन्हा पुन्हा ओजळ भरते का?
तेवढाच क्षणभर विसावा तुझ्या सहवासाचा,
मागे उरुन राहतो स्मृतिगंध ,तुझा आणि पावसाचा .
पुन्हा वाट पाहायची वेड्या तुझ्या बरसन्याची.
का आस लावून जातो तू माझा असन्याची...!!!