Bluepad | Bluepad
Bluepad
होती
P
Pritam Uttam salunkhe
11th Jun, 2020

Share

होती एक अनोळखी
थोडी मनाच्या जवळची
तशी अगदीच अनोळखी न्हवती
थोडी होती ओळखीची
बोलता बोलता ओळख
झाली होती तिच्यासोबत
वाटल होत नशीब पण करतय
कदचित वाटायचं नशीब च
थट्टा करतय आता माझ्यासोबत
तशी होती ती अबोल
आणि मी ही होतो अबोल
पण बघता बघता बोलू लागलो
होतो मी तिच्या मुळे मैत्रीचे बोल
तिच्याशी बोलू लागलो तेव्हा वाटल होत
भेटली एक मैत्रीण
म्हणून च कदचित नात्यांच्या बंधनात
हळूहळू मी मनालाअडकवत होतो
तशी होती ती अगदीच मनाच्या जवळची
वाटल होत मन मोकळ
करायला जागा मिळाली हक्काची
असच बोलता बोलता नकळत तिची
काळजी करू लागलो होतो...
माहित नाही नेमक कोणत नात होत
पण नात्यात मात्र मी पुरता अडकलो होतो..
प्रेम नक्कीच न्हवत ते पण प्रेमा पेक्षा कमी न्हवत
शेवटी वेडच मन ते समजवून पण समजत न्हवत...
जे होत नात तेच मला जन्म भर जपायच होत..
पण कुठे तरी तुझी करायचो
ती काळजीच तुला आवडली नाही
आणि तुझ्या सोबतच्या नात्याची
मात्र मला लाईफ सेव्ह करता नाही आली
नकळत मी नात्याची मर्यादा ओलांडली होती
आणि तिथेच मी आयुष्यातली
महत्वाची व्यक्ती गमावली होती
कोठे तरी उगाच मनाला हल्ली वाटत
तू मला माफ करशील
पुन्हा एकदा का होईना माझ्याशी बोलशील
पण हल्ली तुझी वाट बघून डोळे पण क्षीण झाले
तू कशी असशील हाच विचार करून आता
मन पण वेडे झाले
शेवटी चूक तर माझीच झाली
तुझा विश्वास मला जपता नाही आला
आणि बघता बघता एक अनामिक
नात्याचा द एंड मात्र झाला
तुझ्याशिवाय जगणं आता जगणं मुळीच नसत
तुझ्या आठवणीत तीळ तीळ तुटन
आणि तू दिलेल्या शिक्षेत जिवंत पणाच मरण असत..
शेवटी एक सांगतो जरी एकतर्फी ,
अनामिक नात असल तरी ते नातच असत
तुझ्यासाठी कदाचित वेडेपण
पण त्या वेड्या साठी मात्र त्याच जगन असत
प्रितम साळुंखे

10 

Share


P
Written by
Pritam Uttam salunkhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad