Bluepad | Bluepad
Bluepad
प्रसारमाध्यमांची विश्वासाहर्ता
N
Nagsen Narsuji Dhadse
17th Apr, 2020

Share

प्रसारमाध्यमांची विश्वाससार्हता नागसेन नरसुजी धाडसे  अकोला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाच वैशिष्ट्य संपूर्ण जगात वेगळा आयाम मिळवून देतो.एकसंघता,समता, बंधुता, अखंडता ही मूल्ये देशाच्या संविधानाने देशाला देऊन संपूर्ण जगाला आपले मानवतावादी दृष्टिकोनाचे दर्शन स्वातंत्र्योत्तर काळापासून देत आला आहे. जगातली सर्वात मोठ संविधान याचे चार स्तंभ आहेत.यावर लोककल्याणकारी संरचना अवलंबून आहे.लोकशाहीचे चार महत्वाचे आधारस्तंभ म्हणजे,१)न्यायपालिका २)संसद ३)कार्यकारी मंडळ४)प्रसार माध्यमे. लोकशाही ही या चार स्तंभावर आधारलेली आहे.संविधानाच्या प्रामाणिक अंमलबजावणीवरच देशातील व्यवस्था अवलंबून आहे.परंतु मागील काही वर्षाचा मागोवा घेतला असता या स्तंभांचा काही अप्रामाणिक हेतूने वापर काही घटकांकडून करत असल्याचे दिसून येत आहे.याचा परिणाम मात्र देशाला विविध क्षेत्रातील निर्माण झालेल्या अराजकतेच्या स्वरूपात अनुभवायला मिळते आहे.याचा परिणाम देशावर म्हणजे येथील 130 कोटी जनतेवर प्रत्यक्षात पडत आहे.मात्र कुठलेही कार्यकारण समजून घेण्याची क्षमता नसलेल्या (रिकाम्या डोक्याचा)वापर करवून घेऊन संविधानाच कुचकामी आहे असा अपप्रचाराच कॅम्पेन केला जात आहे. व काही मंदबुद्धी त्याचा बळी जात आहेत.लोकशाहीच्या प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे विस्तृत आढावा आपण पुढील भागात घेऊच. त्याआधी "लोकशाहीचा चौथा महत्वपूर्ण घटक म्हणजे प्रसारमाध्यमे." याचे अवलोकन करूया.देशातील शासनव्यवस्थेत प्रामाणिक जिवंतपणा राहण्यासाठी व शासनातील अप्रामाणिक हेतूला वस्तुनिष्ठपणे जनतेसमोर मांडण्याच कर्तव्य,सामर्थ्य प्रसारमाध्यमांच आहे.याच प्रसारमध्यांनी आपल्या प्रतिमेचंच स्वतः चारित्र्य हनन करून घेतलेलं आपल्याला काही वर्षांपासून दिसून येत आहे.सर्वच माध्यम याचा बळी गेलेत अस नाही तर काही पत्रकार दबावाला,मोहाला बळी न पडता संघर्षपणे सत्याला समोर आणण्यासाठी लढत आहेत.यांच्या कडवट वृत्तीच्या तत्त्वशील पत्रकारितेच देशातच नव्हे तर जगानेही कौतुक केले आहे.अशा जिगरबाज पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन! देशातील चौथ्या स्तंभाच्या डोल्याराला निष्ठेने व धेर्याने जपण्याचा प्रयत्न आपण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले योगदान खूप मोठे आहे. आता येऊ त्या घटकांवर ज्यांनी आपली पत्रकारितेची पवित्र्यता विकून माध्यमांना (धंदा)बनवून आपल्या हत्याराला राष्ट्रविघातक प्रवृत्तीना विकले आहेत.आपली व्यावसायिक कर्तव्याचे व सामाजिक जबाबदारीचे भान न ठेवता देशात असंतोष पसरवू पाहणाऱ्या,धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या तत्वांसोबत मिळून खोट्या बातम्या निर्माण करून  प्रसारित करून संभ्रम निर्माण करून डोकी भडकवण्याचं काम,पाप ही मंडळी करतांना दिसून येत आहे.त्यांना मिळत असलेले (धन्याच्या) कृपेमुळे, पाठबळामुळे त्यांच्यात निर्माण झालेला (character making) चा उन्माद मागील काही घटनांवरून दिसून येत आहे.कुणाची पाप लपवायची व कुणाला पापी बनवायचं?  याची ताकद आपल्यातच आहे अशा मग्रूर मानसिकतेने डील करून काम करण्याची मानसिकता निंदनीय आहेच परंतु तेवढीच देशाच्या एकात्मते व अखंडतेसाठी  धोकादायक आहे.अन्यायाला वाचा फोडण्याच काम सोडून भ्रष्ट व्यवस्थेच्या चरणी लोळण घेऊन अन्याय पसरवण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ,माथी भडकवण्यासाठी बातम्या पेरण्याचं काम करणं हे संवेदशून्यतेच द्योतक तर आहेच परंतु राष्ट्रविरोधी देखील आहे.कालचीच मुंबई येथील घटनेचा संदर्भ घेतला तर लक्षात येईल की,कोरोनासारख्या महामारीमुळे अख्ख जग होरपळुन निघत असतांना,आपल्या देशात,राज्यात विविध स्तरावर सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जात असताना लोकांना lockdown करण्यात येत आहे.राज्यात सरकार, आरोग्ययंत्रणा, पुलीस यंत्रणा रात्रंदिवस झटत असतांना एका न्युज chanel च्या माध्यमातून अफवा पसरवून हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून बातमी पेरली जाते.या अफवेचा बळी पडून हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येऊन गोंधळ घालतात.एवढी सुसूत्रता कशी आली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.याचा अर्थ याला सर्वस्वी याला एक पत्रकार जबाबदार आहे असे गृहीत धरता येणार नाही परंतु पत्रकारिता करीत असताना बातमी संकलित करताना विश्वासार्हता तपासण्याच्या ज्या कसोटी असतात त्यांकडे दुर्लक्ष करून breaking news चा मोह व TRP चा हव्यास हजारो लोकांच्या जीवावर उठला हे नक्की. याच उत्तर तपासाअंती मिळेलच.परंतु हजारो लोकांच्या भावनेशी नव्हे तर त्यांच्या जीवाशी खेळून बातम्या प्रसारित करने हा कायदेशीर अपराध आहेच.तसेच तो मानवतेचा अपराध आहे. केवळ सत्तेचं राजकारण व आपल्या बातम्यांचा धंदा यामध्ये मानवी संवेदना ही विकली गेली आहे का अशी मानसिकता जर समाजात निर्माण होत असेल तर याला प्रसारमध्यमेच जबाबदार आहे. राज्यसरकारने याला गांभीर्याने घेऊन बातमी देऊन अफवा पसरवणाऱ्या अटक केली आहे व त्याची चौकशी सुरू आहे.चौकशीतून करविता धनी कोण? हे अधिकृतपणे समोर येईलच.परंतु समाजाचा आरसा असणारी प्रसारमाध्यमे BREAKING NEWS,TRP  अराजकता पसरवू पाहत असतील त्यांना कायदेशीररित्या जरब बसने गरजेचे आहे.तरच देशात शांती व एकात्मता अबाधित राहील.नागसेन नरसुजी धाडसेधाडसेअकोला7020061502 📷

1 

Share


N
Written by
Nagsen Narsuji Dhadse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad