Bluepad | Bluepad
Bluepad
सोलापूरकर vs मुंबईकर
s
suchitra maddi
11th Jun, 2020

Share


हम्म.... काय म्हणलं होत मी काल 🤔..आमची "तू तू मैं मैं" झाली अन मी स्पेशल कामात बिजी झाली ..आता सांगते बरं स्पेशल काम तें ..दिसतंय न फोटो
सोलापूरकर vs मुंबईकर
तेच बनलं माझ्या घरी 😍.. 🍉 ची टूटीफ्रुटी....सुरवात का झाली ते सांगते 😜.. "तू तू मैं मैं" च कारण ते' साखर ' ओ 😢..जी माझं अंतरात्मा थंड करत आलीय आतापर्यंत ..अहो मला खूप आवडत न गोड 😃..आता तर बंदी च आणलीय यांनी Lockdown 😢 .. माहितीय ना माहेरपण हो बाधले न मला ☺️ . यांच्या मते हो 🙄...मला बोलतात 😏.पण हे काय कमी नाहीय हं.. चांगले च बाळसं धरून आलते .मी माहेरी गेली तेव्हा स्वतःच्या माहेरी जाऊन..हे अsssसं असत बघा किती भरकटतो न विषय 😵..नका देऊ जांभई आज .मी तुम्हाला मस्त बेस्ट आऊट ऑफ वेस्ट रेसिपी देणारे ही मात्र try करा बरं 😍..आपलं कोणाला पचनी पडत नाहीय ठाऊक आहे मला . तुम्हला नाही व माझ्या माहेर च अनुभव हो 😃😂...बरं बरं 🙏..विषय असा होता भाज्या संपत आलेल्या अन घरपोच सेवा काही कारणास्तव बंद झाली यांना म्हणलं," अहो जरा बघा ना..! जाऊन या की जरा..! करत लाडीगोडी लावली सोबत दुकान कडं पण वाट वाकडी करून " जरा हे आणा ,ते आणा " करत लिस्ट देत होते तो पर्यंत स्वारी गप्प होती नेहमीप्रमाणे 'हं ..हं ..च आलाप ही आळवण चालू होतं . मी " किलो भर साखर" म्हणलं पण नाही की लगेच सूर बदलला हो "हं" पासून "ह्यां" पर्यन्त गेला 🙄.."क्या हैं ये हर बार किलो भर शक्कर ,क्यू चाहीय??. करती क्या हो ?? कुछ बनाती तो नहीं रखने को जगह नहीं .खुद को देखो जरा... वेट चेक करो जरा ..ब्ला ..ब्ला ब्ला...😣😏😑😐..
..........😢😢...असं म्हणून गेलं धनी परत कॉलवर 🙄..माझं मूड अन सूर दोन्ही गेला हो ..रडले नाही ओ मी ..पक्की सोलापुरी मी पण तार स्वर लावला ,"देखना हैं क्या करती हु ,?? देखना है ??..रुको दिखाती हुं...😡 मनांतच हो, काही केल्याशिवाय आपण आवाज नाही करत पहले "अकॅशन फिर साऊंड ".. तरातरा उठून गेली फ्रीज ओपन केलं यांनी अर्ध कलिंगड खाल्लं होत थोडं मला ठेवलं होतं, ते उचललं सपासप चाकूने वार केलें अन खाल्लं ..हुश्श आत्मा थंड झालं हो खूप गोड अन रसाळ होतं कलिंगड 🍉🍉 ..सवय आहे न खूप राग आला अन रडू आलं तरी काहीतरी खाऊन घेते मी. 😂.खरंच मूड चेंज होतो बरं 😁 मग डोकं बी चालताय की ..असं पण यांच्या मूळ च पेंडिंग पडलेली एक रेसिपी करू म्हणलं ती पण लॉंगटर्म वाली म्हणजे कसं ती खाऊन संपणार लगे नाही अन म्हणजे एका वेळीं खूप कॅलोरी पोटात जाणार नाही अन गोड केल्याचं समाधान 😍...यांची कुडकूड बंद होईल ...हो ..हो .फोटो दिसलं न ते तेच .. टूटीफ्रुटी हो कलिंगडा ची 🍉🍉 सोप्पीय रेसिपी खात खात चालू होतं भरपुर विडिओ धुंडाळण ..शेवटी एक फायनल केली कोणाची ते नाही आठवत रेसिपी देतेय न घ्या डोक्यात फिट करून ...कलिंगडाचे राहिलेलं पांढरा भाग वेगळा करून घेतला ..मेहनती च काम हो ..हिरवा पण व्यवस्थित सुटायला हवा अन लाल पण ..मग छोट्या आकाराचे तुकडे करा जे माझे वाटीभर झालते ..पहिले ते बुडून वर थोडं लेवल ठेवून पाण्याची चांगलं पारदर्शक होईपर्यंत उकळायचे जवळजवळ 10 मिनिटे मी टाईम लावलं होत हो आपलं कसं सगळं शिस्तीत असतं काम ..मग जाळीतून पाणी निथळून घ्यायचं थंड होऊ द्यायचं म्हणजे तो पर्यंत दुसरं काम आहे की वाटीभर तुकड्यांन साठी पाऊण वाटी साखर अन पाऊण वाटी पाणी घेऊन गॅस वर उकळायला ठेवलं साखर विरघळे पर्यंत हलवलं चमच्याने ..मग ते तुकडे टाकले 🍉 चे ...मग मिडियम फ्लेम वर ते जवळ जवळ 10 मि शिजवत ठेवले.. essence टाकायचं vanilla चं थोडं .पण माझ्या कडे नव्हतं 🤦 (सोलापूर ला विसरली) असो चेरी असं पण कुठं नुसतं खातो कशात तरी घालतो एवढं नाय फरक पडणार म्हणून सोडलं ते तिथं च. मग ते तीन वाट्या घेतल्या तिन्ही त थोडं फूड कलर होत मॉम कडून उचलून आणलेलं पापड करायचे ते घातलं पण दोनच रंग होते टोमॅटो लाल अन केसरी पिवळा मग शिकलेल कुठं वाया जात नाही बघा drawing .लाल + पिवळा = नारंगी ...पटापटा घेतले ठेवले रातभर तसं 5/6चालतय अन परत सकाळी अजून एक काम ते पाणी परत निथळून घ्यायचं जाळी वर पोह्याच्या ठेवा अन खाली ताट ठेवून घ्या मी थोडा tissue paper न शोषून घेतलं सुकत आहेत अजून ..(थोडं कनफ्युज होते सावलीत की उन्हात वाळवु करत ते फॅन खाली च सुखवलं अन सकाळ झाली खिडकीत कोवळे ऊन येत तिथं सुकवलं प..झाली बघा फायनल रेसिपी .मस्त झालेत न पिवळा रंग केशर वाला होत म्हणून फिक नाही (लेमन ) दिसतोय नारंगी च्या जवळ जाणारा दिसतोय जे बी हो लै भारी दिसत आहेत diamonds /हिरे/माणिक माझे 💎💎...किती किती फोटो काढले सांगू तुम्हाला। 😍... अन हो आमच्या मुंबईकराना आवडलं बरं..😍 दुःख याचं की माझं आवडतं हिरवा रंग नव्हता .कोई बात नाही फिर करेंगे Lockdown छूटा तो..इतना काफी है मेरे लिए अगले २-३ महिने के लिए ..!..चला पटापट सांगा कोणी कोणी केली यावर्षी टूटीफ्रुटी 🍉 ची ??

सुचित्रा आनंद 👩‍⚕️👩‍🍳

1 

Share


s
Written by
suchitra maddi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad