Bluepad | Bluepad
Bluepad
मोक्षदा पाटील यांचे विचार!
Avinash Salve
Avinash Salve
17th Apr, 2020

Share

📷 समाजशास्त्र मध्ये एक सिद्धांत खूप प्रचलित आहे त्याला म्हणतात 'Nature Vs Narture' (निसर्ग विरुद्ध संगोपन ) म्हणजे काय तर निसर्ग,निसर्गाने तुम्हाला दिलेला आहे आणि निसर्गाचा जेवढा भेदभाव आहे तेवढाच.’Nurture’ काय आहे,तर उदाहरणार्थ एखादे रोपटे आहे किंवा मूल आहे त्याला फक्त जन्माला घालून चालत नाही  त्याला पाणी घालावे लागते, त्याला अन्न भरवावे लागते, कपडे घालावे लागतात, ऊन पावसापासून संरक्षण करावे लागते; त्याला म्हणतात संगोपन ज्या पद्धतीने आपलं संगोपन होत. ज्या पद्धतीने आपले रोपटे वाढविले जाते त्यावर त्याची प्रगती किंवा अधोगती अवलंबून असते. हा माझा आवडता सिद्धांत आहे. हा सिद्धांत तुमच्यापुढे ठेवण्याचा उद्देश हा आहे की यापुढील माझे विचार या सिद्धांताला धरून आहेत. कुटुंबांमध्ये मी अशी काही उदाहरणे बघितलेली आहेत जेव्हा मुला-मुलींमध्ये घरा मधूनच भेद भाव होतो. मी अशी ही घर बघितले आहे की जिथे एक मुलगा एक मुलगी न म्हणता मला दोन मुलं आहेत असे म्हणतात. त्यांच्या साठी दोन्ही समान आहेत. अशी काही विचार मांडणारे लोकं शहरात आहेत, तर मुलगा होता होता पाच मुली, सहा मुली जन्माला घालणारी महाभाग सुद्धा मी शहरांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये बघितलेली आहे. शहराने आपल्याला ज्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळवून दिले आहे मी त्याला "मूव्हमेंट" असं म्हणते. मूव्हमेंट म्हणजे काय? समजा आज रात्री ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागांमध्ये "चल आपण एक फेरफटका मारून येऊ" इतक्या मोकळेपणाने असं मुली म्हणू शकता का किंवा करू शकता का?नाही.पण पुरुष मात्र कट्ट्यावरती जाऊन बसू शकतात. तुमचा मुलगा असेल तो आईला, बायकोला न विचारता कधीही बाहेर जाऊ शकतो आणि कितीही  वाजता परत येऊ शकतो त्याला ते स्वातंत्र्य आहे, पण मुलीला मात्र नाही. इथे तुम्ही म्हणणार की गुन्हेगारी वाढलेली आहे, रात्री-बेरात्री असं बाहेर जाणे मुलींसाठी ठीक नाही, मुलींची इज्जत म्हणजे काचेचे भांडे असतं. बरोबर! तिला कोणी हु की चु केलं लगेच आमच्या घराण्याची, खानदान ची इज्जत मातीत मिळणार वगैरे वगैरे. आपली मानसिकता अशी आहे ना, की मुलीवर/महिलांवर बलात्कार झाला, हे शब्द ऐकायला चांगले वाटत नाही, पण माझं काम आहे, आणि दिवस-रात्र अशा प्रकारच्या समाजातील वाईट गोष्टींशी आमचा पल्ला पडत असतो. जेव्हा बलात्कार होतो तेव्हा लोकांची मानसिकता अशी असते की "ही" तेथे कशाला गेली? तिच्यातच काहीतरी चूक असणार की जिने बलात्कार्‍याला आकर्षून घेतलं किंवा मग हीच अगदी जास्त फॉरवर्ड आहे, ही जरा अति स्मार्ट आहे. तिने लिपस्टिक लावली, काजळ घातलं, चटक फटक भडकीला रंगाचे कपडे घातले. तिचं वागणं बोलणं उठवळ आहे. ही काही बाईसारखी नीट वागत नाही, सभ्य घरातील खानदानी बाई नाही त्यामुळे तिनेच असं काहीतरी केलं असेल की त्या बिचाऱ्या पुरुषाच्या भावना अनावर झाल्या आणि तो त्याचे माणूसपण सोडून पशु बनला. ही मानसिकता असते.याबाबतीत अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.आज मी पोलीस क्षेत्रात आहे; मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असताना, ट्रेनिंग मध्ये कधीच मला मुलगी असण्याचा वेगळा अनुभव आला नाही.मुंबईसारख्या शहरांमध्ये माझं संगोपन झालेलं आहे. पण जेव्हा मी सर्विस मध्ये आले तेव्हा हे प्रकर्षाने जाणवलं की मुलगी आणि मुलगा हा भेद समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जे आपल्याला मिळालं, कदाचित ते नशिबाने मिळालेलं असेल. काही हक्क आम्ही झगडून मिळवले ले असेल. ते सर्वांना तेवढ्याच सोपेपणाने मिळेलच असे नाही.जर एका व्यक्तीला किंवा समाजातील काही व्यक्तींना जर ते स्वातंत्र्य मिळत आहे, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना ते उपलब्ध करून दिले आहे. तसेच आपण पालक आहोत आपण आई-वडील आहोत आपण ते आपल्या मुलांना का उपलब्ध करून देऊ शकत नाही. का आपण मुलां-मुलींना समप्रमाणात स्वातंत्र्य उपलब्ध करून देऊ शकत नाही? आज मुला-मुलींमध्ये म्हणा, किंवा समाजामध्ये हा 'बाई' वर्ग असतो ना आणि विशेषतः त्यात आई नी कसे असायला हवे हा समज कसा आहे बघा; घरामध्ये पुरणपोळी ,बासुंदी बनवली तर आई नीं ते सगळ्यात शेवटी खायचं हा अलिखित दंडक असतो. जे उरलेला असता ना सगळ्यांना वाटून झाल्यानंतर ते. किंवा त्यांची  तब्येत खराब झाली, त्यांना काही त्रास होत असेल, त्या सांगायला किंवा उपचार घ्यायला खूपच ओढतान करून घेताना दिसतात.  स्वतःचा प्राधान्यक्रम स्वतःच सगळ्यात शेवटी ठेवलेला आहे. यामध्ये स्त्रीला एकटीला दोष देणार नाही, कारण ज्या वर्गाकडे पारंपारिक रित्या आपल्या देशातच नाही तर संपूर्ण दुनियेमध्ये दुर्लक्ष झालेला आहे किंवा एक प्रकारच्या शोषण व्यवस्थेचा बळी येथे हे शब्द घासून घासून बोथट झालेले आहे. पण ही व्यवस्था आहे मग ती कुटुंब व्यवस्था असो, धर्मव्यवस्था, की इतर काही प्रचलित समाज व्यवस्था असो त्यामुळे स्त्री शोषित बनलेली आहे. त्या व्यवस्थांचा विशेषतः कुटुंब व्यवस्थेचा, कुटुंब हे स्त्री वादामध्ये, मार्क्स वादामध्ये शोषणाचे एक 'युनिट' मानले गेलेले आहे.आईचे अधिकार वडिलांना नाही, वडिलांचे अधिकार आईला नाही. वडिलांचा जो "सुप्रीमोपणा" आहे, घरामध्ये वडिलांच जे स्थान आहे ते आईला नाही. जो माणूस पैसा कमावतो, ती मग स्त्री जरी असेल तरी तिला ते आर्थिक स्वतंत्र असेलच असे नाही जे पुरुष उपभोगतो. घरामध्ये जरी दोन्ही नवरा आणि बायको कमावती असतील तरीसुद्धा. तिला घरी आल्यावर भाजी निवडणे, स्वयंपाक करणे, मुलांचा अभ्यास घेणे, कपडे धुतले का? त्यांना इस्त्री केली का? डबा भरला का? बिल भरलं का? हे खराब आहे, बाथरूम खराब आहे. हेसुद्धा बघावं लागतं. आणि तोच कमावता नवरा घरी आल्यावर मस्तपैकी चहा पीत पेपर वाचू शकतो आणि त्याला चहा कोण बनवून देणार तर ती त्याची नोकरदार बायको. आश्चर्य म्हणजे हे नोकरदार स्त्रियांना सुद्धा मान्य असतं,हो मग दुसर कोण करणार? नवरा थोडी चहा बनवू शकतो. नवरा कशाला अंथरून पांघरून आवरून ठेवणार. केर काढायचं..नाही नाही ते तर बायकांचं काम आहे. अशी संकुचित वृत्ती जोपसत आहात. पण जर बायका आज पोलीस अधीक्षक बनून तुमच्या जिल्ह्याच संरक्षण करत आहे तर तुमचे पुरुष घरामध्ये तुमची थोडी मदत नाही करू शकत का?. आम्ही काही पहिले नाही आणि शेवटच्या पण नाही. या आधीही आपल्या देशाच्या पंतप्रधान महिला राहून गेलेले आहेत, राष्ट्रपती राहिलेल्या आहेत, संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वाने त्या उच्चस्थानी आहे. त्या जर अशा गोष्टी करू शकतात ज्या की "सो कॉल्ड" पुरुष अधिराज्य गाजवणारी मानले जात होते. तर पुरुषांनी थोडा वेगळा विचार का करू नये.?मला इथे नमूद करायचे आहे की ह्या विरोधभासला  हसून, किंवा खजील होऊन शांत बसायचं नाही, तर त्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो जो त्याग लागतो तो करण्याची खरंच गरज आहे.दुसरा एक विषय  मी नेहमी सांगत असते की आजवर महिलांना, मुलींना सांगितली जाते की तुम्ही  पुढे या शिका. मी आज नव्या दहाव्यांदा सांगत असेल तुम्ही पुरुष का मुलींना सांगता तुम्ही संघर्ष करा.  माझं म्हणणं आहे की नाही. का तुम्ही सतत त्यांच्या मागे लागतात, सतत हे करा ते करा सांगत राहतात, मी स्त्रियांना बिलकुल काही सांगणार नाही, मी त्यांना कराटे पण शिकायला सांगणार नाही, आणि त्यांनी नेहमीच फक्त छान छान देवी, चांगली बाई, सुंदर सुंदर बनवून राहव असं तुम्हाला काही सांगणार. स्त्रियांनी एकदम मोकळे राहायला हवं, तुम्ही सुद्धा माणूस आहात तुम्हाला सुद्धा त्या चूका करण्याच स्वातंत्र्य आहे जे की इतरांना आहे. बाकीच्यांना जे करण्याचे स्वातंत्र्य आहे; फिरण्या बोलण्या-चालण्याच , खाण्याचं, पिण्याचं, घालण्याचं ते तुम्हाला बिलकुल उपलब्ध आहे. मी बिलकुल सांगणार नाही की मुलींनी दहाच्या आतच घरात या, किंवा सातच्या आत घरात पाय पाहिजे, बिलकुल नाही. कदाचित हे पुरुषांन  झोबू शकतं. असा आहे का काही? नाही ना! मला पुरुषांना सांगायचं आहे महिलांना, मुलींना आतापर्यंत खूप सांगितलं, त्यांनी त्या सगळ्यातून पुढे येऊन अभ्यास पण केला नोकर्‍या मिळवल्या, आपलं घर सांभाळून कुटुंब सांभाळली. आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलं.  मुलींची लग्न लावून दिली,तिचं लग्न लावून दिलं म्हणजे तिच्या नावापुढे दुसरे आडनाव चिकटले, की आपली घनघोर जबाबदारी संपली आता आपण मोकळे स्वर्गात जायला. एक मुलगा जन्माला आला मग तो कितीही आगाऊ असो कितीही फाजील असो, काहीही गुणवत्ता त्यात नसेना का, तो बेरोजगार असो पण तो मुलगा आहे तो तुम्हाला अग्नी देणार आहे आणि तुम्हाला स्वर्गात पोहोचवणारा आहे. बरोबर! तर हे  सगळं सगळं सोडा आता तर हे सांगण्याची सुद्धा वेळ गेलेली आहे. तुम्हालाही मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगत आहे. मी पोलिस असल्याकारणाने तुम्हाला रुचेल पचेल अशाच पद्धतीने समजावे असे नाही. बर दुसरी भीती काय असते पुरुषांना,  त्या पुरुषी वृत्ती पासून महिलांची सुटका झालेली आहे असे नाही. आज काहींना वाटते की की मुली शिकल्या, नोकरी केली, व्यवसाय केला किंवा घराबाहेर पडल्या की त्या आगाऊ होतात, अति स्मार्ट होतात. आमच्या घराकडे कोण लक्ष देईल,? मग त्यांच्या डोक्यात त्यांचे स्वतःचे विचार येतील मग ते आमच्या अन्याय पूर्वक गोष्टी कशा सहन करतील? आणि  यातून आपला समाज खाई मध्ये लोटला जाईल. घटस्फोटांचे प्रमाण वाढेल?अशी अनेकत्याच्यामध्ये फाटे फोडण्याचे प्रकार सुरू होतात.आज तुम्ही आजूबाजूला बघाल दोघेही नवरा बायको कष्ट करत आहेत घरात असेल बाहेर असेल. अशी उदाहरणे कमी आहेत का? नाही तर मग आपण उगाचच्या फाजील कल्पनेमध्ये का गुरफटून राहावं. अशा प्रकारच्या गैरसमजुती भीती आपल्या मनामध्ये का ठेवत आहोत. आपण समाजासमोर अशी उदाहरणे का नाही आणत जेथे दोघेही नवरा बायको स्वतःच्या स्वतंत्र क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत, ज्याला जे पाहिजे ते करत आहे, मी म्हणत नाही की प्रत्येक स्री ने नोकरी केलीच पाहिजे, प्रत्येक पुरुषाने नोकरी केलीच पाहिजे. जर पुरुषाचे मन असेल कि मी घरी राहतो तू नोकरी कर तर खूप चांगला आहे. तिथपर्यंत आपली मानसिकता यायला हवी. आज शहरांमध्ये व्हायला लागलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही. फक्त  बघण्याची दृष्टी थोडीशी वेगळी हवी. निकोप आणि सकारात्मक. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायला पाहिजे म्हणजे ही खूप काही चांगली सवय आहे अस नाही, असं मला वाटतं पण बरेचदा आपल्याला एखाद्या गोष्टी खटकत असतील तर तुम्ही नेहमी विचारला पाहिजे असे का? एखादी गोष्ट आपल्याला वाटत असेल की चुकीची आहे, तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की ही अशी का आहे? आहे त्या स्वरूपात माझ्यासमोर का आहे? मग ती धार्मिक तेढ असेल जातिवाद असेल, गरीब-श्रीमंत मधील तेढ असेल, स्त्री पुरुष असमानता असेल. या सर्व गोष्टींकडे आपण थोडसं डोळसपणे बघणं आवश्यक आहे, कदाचित आपण लहान असतानाही सगळे प्रश्न आपल्याला पडतात पण मोठी होत असताना आणि सामाजिक कारणामुळे आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतो. आपण एक मेंढीच्या कळपातील मेंढी बनून राहतो. जसा तो कळप जातो, त्या दिशेने आपण विचार न करता जात असतो.  पण जेव्हा थोडे लहान असतो तरुण असतो तेव्हा आपल्या मध्ये अनेक बंड येतं आपल्यात अनेक प्रश्न येतातत्याचे स्वागतच आहे. आपल्यासमोर जे आहे आपल्याला जे दिले गेलेले आहे ते जशेच्या तशे स्वीकारणे माझ्या स्वभावात नाही. त्या प्रश्नांचे उत्तरे शोधण्यासाठी गेल्यामुळे जिज्ञासा निर्माण झाली आणि त्या जिज्ञासू मुळे अजून प्रश्न पडायला लागले आणि त्याची उत्तरे शोधायला लागले. तर हे एक प्रकारचे वर्तुळ आहे. यामुळे तुम्ही अजून चार गोष्टीकडे डोळसपणे बघायला लागतात त्याबद्दल वाचन करायला लागतात, लोकांना भेटतात जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील. त्यातून तुमचे व्यक्तिमत्व विकास होईल, तुमच्या परिवारासाठी तुमच्या स्वतःसाठी त्याचा काहीतरी फायदा होत असेल, त्यातून चांगले विचार मिळणार असतील तर त्याचे नेहमीच स्वागत आहे. नुसते विचार ऐकून नाहीतर आयुष्यामध्ये; जो जीता वही सिकंदर असते. नुसतं बाता मारून तर काही होत नाही, समोर जो यश दाखवेल, नुसत्या बाता मारणार नाही ते यश. जेव्हा असं यश मिळते तेव्हा त्याला पर्याय नसतो. मी मुलींना विशेषता सांगू शकते की तुमची जी काही क्षमता आहे त्याची तुम्ही एक अस्सल चाचणी घ्या, निश्चितपणे तुम्ही काय करू शकता तुमची इच्छा काय आहे ते तपासा. त्यांच्या आई-वडिलांना मी सांगू इच्छिते मुलींची क्षमता बघून तिच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, मुलींच्या लग्नासाठी दागिने जमविणे पेक्षा तिच्या शिक्षण वर तुम्ही खर्च करा. आजच्या काळात  अशी कुठली मुलगी आहे मला सांगा स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिचे आई वडील दुःखी आहे. त्यांच्या लग्नाला काही एखाद दोन वर्ष उशिरा होईल. तर ठीक आहे,ते स्वीकारा. मुलींचे लवकर लग्न झालं पाहिजे हा अट्टहास सोडला पाहिजे.व्यवसाय असो की राजकारण असो यामध्ये महिलांची संख्या लक्षणीयरीत्या कमी आहे. आणि ती कमी असायचं काही कारण आहे असे मला वाटत नाही. कारण तुम्ही दहावी-बारावीचे निकाल बघाल तर त्यामध्ये नेहमी वृत्तपत्रांमध्ये मथळा असतो की मुलींनी मारली बाजी... पुढे कुठे जाता ह्या मुली? पुढे त्यांचं काय होतं पुढे त्या पाहिजे त्या क्षेत्रात जातात का? पुढे कुठे ते आपले नाव चमकतात काय? नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्या टिकून राहतात? स्वतःचा व्यवसाय कोणी सुरु करत का? आपल्या नोकरी मध्ये पुढची टप्पे गाठू शकतात का? हा थोडा संशोधनाचा विषय आहे. किती मुली म्हणतात की मला आज अब्दुल कलाम व्हायचं आहे. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, शास्त्रज्ञ व्हायचं आहे. अशा क्षेत्रामध्ये स्त्रियांची संख्या कमी आहे. तुम्ही डॉक्टर  होतात, नर्सेस होतात, इंजिनीयर होत असतील पण असे वेगळी क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये अजूनही कदाचित मुलींना आकर्षण निश्चित असतं पण ते आकर्षण अगदी पद्धतशीररीत्या दाबून टाकला जातं. त्यांची स्वप्न ते दबून जातात त्याच्यामध्ये आपल्याला काही कुठे करायचं आहे ही ती स्वतःहून विसरून जातात आणि परिस्थितीशी खुप लवकर त्या मिळतंजुळतं घेतात. अशीच मुलगी चांगली असते ना? जी लवकर मिळतेजुळते घेते. जी मुलगी अडून राहते हट्टीपणा करते, चांगली  नसते ?ती आगाऊ असते किंवा तिचं पुढे कसं होईल, सासूची जमेल का? सासऱ्याशी नीट वागेल का? तिथे घरामध्ये सगळ्यांशी जमेल का? असे प्रश्न तिला लगेच विचारले जातात. पण मुलगा जेव्हा हट्टी असतो तेव्हा त्याला विचारता का, अरे तू तुझ्या बायकोची कसा वागशील? तू इतका हट्टी आहेस, मुडी आहेस, मूर्ख आहेस, रागीट आहेस असं कधी मुलंला विचारता का?नाही. तर मग तुम्ही नेहमी मुलींनाच का आदर्शवादी बनवण्याच्या मागे असता. तिनेच का परिपूर्ण असावा अशी अपेक्षा करता. जेव्हा नवरात्रीचा उत्सव असतो तेव्हा दरवर्षी मी पाहते सगळ्यांना मध्येच आठवण येते की अरे त्या अधीक्षक दुर्गेचे रूप आहे. किंवा शारदेचे रूप आहे पण आम्ही जर काही कडक कारवाई केली, आम्ही जर कोणाला नडलो तर आमच्या बाईपणावर यायला ही लोक कमी करत नाही. आमची गोष्ट नाही पण ज्या महिला कार्यालयांमध्ये क्लर्क म्हणून काम करत असतील, बँकेमध्ये असतील जोपर्यंत सर्वकाही चांगलं चालू असत तोपर्यंत त्या चांगल्या असतात नुसत्या चांगल्या नाही खूप चांगल्या असतात. त्यांच्यामध्ये खूप गुण असतात"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते" या प्रकारची त्या असतात. पण जरा त्यांनी स्वतःचा स्टॅन्ड घेतला,जर त्यांनी सांगितले की नाही हे असं नाही तुम्ही चुकीचं करत आहात आणि हे बरोबर आहे. हा माझा अधिकार आहे. जेव्हा त्यांचा अधिकार मांडायला लागतात, अधिकाराच्या भूमिकेतून बोलायला लागतात. तेव्हा त्या कोणाला आवडत नाही. बरोबर! जेव्हा अधिकार जतवण्याची बात येते, तेव्हा महिलांनी फक्त आई म्हणून लाडाचा हक्क जतवण्याच असतो. त्यांनी कोणाला ओरडायचं नसत, नडायच तर बिलकुलच नसतं. कोणाला शिंगावर  तर बिलकुल घ्यायचं नसतं. मुलग्यांना/पुरुषांना सांगू इच्छिते की आम्ही आम्हाला पाहिजे ते करणार. तुम्ही आमच्या बाई पणावर् या की कशावरती या जे बरोबर आहे ते बरोबर आहे. त्यामुळे आम्ही पण तुमचे पुरुष पण काढू तुम्ही चुकीचं वागल तर. इथे मला स्त्री आणि पुरुषांमध्ये फूट पाडायची नाही. पण जे बरोबर आहे ते बरोबर आहे यासाठी स्टॅन्ड घेणे खूप महत्वाचा आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की स्त्री असो की पुरुष आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून बघायला हवे, व्यक्ती म्हणून बघितले पाहिजे. ठीक आहे आपल्या मध्ये नैसर्गिक भेद भाव जरूर असतील आणि असायलाही हवेत पण जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्या हातात नसते आपण स्री म्हणून जन्म घेवु की पुरुष म्हणून , आपण कोणाच्या घरात जन्म घेतो कुठल्या जातीत जन्माला येतो हे आपल्या हातात नसते. आपण मुलींसाठी मुलगी वाचवा मुलगी शिकवा असे म्हणतो हे निश्चितच स्वागतार्ह आहे पण माझं म्हणणं आहे,"मुलांना वाईट संस्कार पासून वाचवा त्यांना चांगले शिकवा". लोक म्हणतात की मॅडमने रोडरोमिओंचा बंदोबस्त केला, हे रोडरोमियो कोण असतात.आपल्या शहरांमध्ये हे बाहेरून लोक येऊन रोडरोमियो गिरी करणार आहेत का?.  ते आपलेच मुलगे असतात, आपल्या ओळखीतले मुलगे असतात.  आपण म्हणतो की जाऊ द्या मॅडम चांगल्या घरातला मुलगा आहे त्याच्याकडून थोडीशी क्षणभरात चूक झाली अशांना मग मी सोडत नाही त्यांच्या रोमियो गिरीचा बंदोबस्त करते. काही लोक आम्हाला अजून सूचना देतात की तुम्ही मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्या,तर मी अजिबात देणार नाही, त्याच्या ऐवजी मी मुलांना सांगणार आहे की तुमचं वर्तन सुधारा.अशी मुलींवर ती वेळच का यावी की त्यांनी कराटे शिकावे तुमच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून का? मला ते तात्विकदृष्ट्या पटत नाही. आम्ही पोलीस म्हणून अगदी प्रतिबद्ध आहोत. आमची जबाबदारी स्त्रियाच नाही तर पुरुष संरक्षणाची सुद्धा आहे. त्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. पण यामध्ये मुलगे तरुण युवावर्ग, जे शूटर आहेत,ज्यांना वाटते आपण मस्त शंभर दोनशे रुपयाची हेअर स्टाईल केली, थोडसं कडबिड घातलं, जराशी जर्शी वगैरे घातली आणि बापाच्या पैशाचं 100 रुपयाचे पेट्रोल गाडीत टाकले आली सुसाट गाडी चालवली म्हणजे झालो आपण कुल, नाही का? किंवा मग मोठासा फोन आई-वडिलांना मागे लागून घ्यायचा आणि कट्ट्यावर बसायचं काहीतरी इकडेतिकडे टाइमपास करत. आणि त्यातून दुसऱ्याला त्रास होईल असं काही करायचं. कारण त्यांना आत्मविश्वास असतो काही केल तरी आपले आई-वडील आपल्याला वाचवतील. कारण आपण मुलगा आहोत. बरोबर? ही वृत्ती आयांनी आणि वडिलांनी आपल्या मुलग्या मध्ये तोडायची आहे. कारण अशे मुलगे बाहेरून आलेले नसतात ते आपल्या मधूनच बनतात आपण समाज आहोत, हे आपण आपल्या मुलग्यांना जर शिस्त लावली, तर अजून चार मुले त्यांना बघून कदाचित शिस्तीत राहतील. कदाचित एक सकारात्मक संदेश समाजामध्ये जाईल. मुलग्यांना तर कोणी कधी काही समजावून सांगत नाही, याउलट मुलींना नेहमी अशी हसू नको! अशी बघू नको! अशी हात वारी करू नको! खाली मान घालून, सातच्या आत घराच्या आत असली पाहिजे असे नेहमी सांगितले जाते. पण मुलांना आपण सांगतो का," अरे बाबा असं गुटखा खाऊन पचापचा इकडेतिकडे थुंकू नको". "रस्त्यावर बिडी सिगारेट फुकू नको". किंवा "घाणेरडे, वेड्यासारखी आवाज काढू नको मुलींना बघून".  मुलींना बघून तुझ्या आत मध्ये जी ऊर्मी येते लगेच बाहेर काढण्याची काही गरज नसते तुम्ही कुत्रा नाही आहात  दिसला खांब की पाय वर करून मूतले. हे विषय आई आणि वडिलांनी बघायचे आहेत. माझ्या ट्रेनिंग बद्दल तुम्हाला सांगायला आवडेल.ट्रेनिंग मध्ये असं काही नाही तुम्ही महिला आहात म्हणून तुम्ही ही हलकी बंदूक पकडा, ही छोटीशी लहान बंदूक , गुलाबी रंगाची. असं काही नसतं. जी सामग्री पुरुषांसाठी आहे तीच स्त्रियांसाठी. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. तसेही आम्ही वर्दीच्या सेवी मध्ये आहे ्याचा काय अर्थ असतो की आम्ही सगळे समान आहोत महिला आणि पुरुष अधिकार्‍यांमध्ये काही विशेष भेद नाही आम्हाला ट्रेनिंग मध्ये सकाळी दररोज ४ किलोमीटर धावाव लागायचं, दररोज पुश अप,, रसी वर चढून जाणे, पोलवर चढत जाणे. किंवा एखादी भिंत असेल ती पार करून जाणे. तेथे आपल्याला शिकवल जात. तिथे आपल्याला कळतं की पुरुषांना काही अगोदर पासून दोरीवर चढून जाणे काही येत नसतं. वह भी सीखते हैं, गिरते हैं हम भी सकते हैं हम भी गिरते हैं. म्हणजे मला असं वाटते की मी करू शकते तर कोणीही ही गोष्ट सहज करू शकते. आपल्याला आधी त्या सर्व गोष्टी अवघड वाटतात पण आपण त्या सगळ्या करू शकतो. जे शिकवले जातो ते येऊन जात.  आपण पडतो रक्त येत नंतर ती जखम भरून येते हे आपण शिकतो. जखम ज्याची भरते तोच पुढे जाऊन काहीतरी शौर्य दाखवू शकतो. आपली वैयक्तिक अडचण दूर सारून काम करण्याच्या परिस्थितीमध्ये घेऊ शकतो. माझ्या प्रशिक्षण दरम्यान चा एक अनुभव आठवतो. घोडेस्वारी साठी जर सकाळचा सहा वाजे चा तास असेल तर सकाळच्या वेळी घोडे एकदम चांगल्या मूडमध्ये असतात जोराने उड्या मारत असतात अशाच एका सुंदर सकाळी घोड्याने मला खाली पाडले मला काहीच सुचत नव्हतं माझ्या डोक्यामध्ये कंकर्षण आले होते, आणि माझ्या बरगडी चं हाड मोडलं पण त्यावेळी आमचे वस्ताद आम्हाला घोड स्वारी शिकवत होते ते बोलले कुछ नहीं हुआ मैडम रो मत उठो और उसी घोड़े पर बैठकर फिर से एक राउंड लगाओ फिर मैं आपको नीचे उतार लूंगा। याचं काय कारण आहे ज्या गोष्टीमुळे आपण धडपडलो आपल्याला ठेच लागली त्याच गोष्टीवर जर उद्या आपल्याला मात करायची आहे तर आपल्याला त्या गोष्टीला सामोरे गेल्याशिवाय पर्याय नाही.📷 जर स्री जन्म देऊ शकते एकापेक्षा अधिक जीवांना जन्म देऊ शकते त्या बाळाला दुध पाजून मोठे करू शकते रात्री रात्री जागु शकते. त्या स्त्री च शरीर ह्या गोष्टी करू शकत नाही का? निश्चित करू शकते यापेक्षाही अवघड गोष्टी स्री करू शकतात. आता 40 किलोमीटर रूट मार्च असतो, त्याच्यामध्ये आम्हाला साधारण साडेपाच सहा किलो ची रायफल आणि पाठीवर साधारणतः दहा किलो सामान घेऊन रात्री निघायचं जंगलामधून वाक करायचा अंधारा मधून आणि सकाळपर्यंत अकॅडमी त परत यायचं. तर आपल्याला वाटते की 40 किलोमीटर बापरे हे तर मी करूच नाही शकत. शक्यच नाही? पण मी सर्वांना सांगते की जेव्हा आपण चालत असतो तो टास्क पूर्ण करत असतो तेव्हा आपल्या मध्ये स्त्री पुरुष हा भेद उरत नाही. तेव्हा आपल्या मध्ये तो अधिकारी असतो ज्याला आपल्या जबाबदारीची कल्पना असते की उद्या मला माझ्या फोर्स ला जंगलातून घेऊन जाण्याची आवश्यकता पडली , काही प्रसंग आला आणि रात्रभर आम्हाला जागायचं आहे, एखाद्या दुर्गम गावांमध्ये आम्हाला चालत घेऊन जायचं आहे तर मी सक्षम आहे माझ्या सहकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी. ही भावना त्या वेळेस आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे तुम्ही "उफ ओह मा मला हे लागलं".किंवा मग "माझा पाय दुखायला लागला मी नाही आता बाई चालू शकत". हे असं आपल्या तोंडातून येतच नाही. आणि ते येऊ ही नाही. मला वाटते की ही ट्रेनिंग असेल किंवा इतर हि आणखी काही ट्रेनिंग असतील कॉलेज असतील तिथे मुलगी असण्याची हक्क आपण मागितली पाहिजे, जसे की स्वच्छतागृह, इतर काही सोयी आवश्यक असतील तर मागितले पाहिजे पण मुलगी म्हणून कॉलेजच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या प्रोफेशनल कामांमध्ये मुलगी असल्याचा बाऊ तर करत नाही आहे ना हे बघावं. आवश्यकता नसताना मी स्त्री आहे म्हणून मला लवकर घरी जाऊ द्या असं काही प्रकार होत असेल तर हे बघण्याची गरज आहे.कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा जशी घरांमध्ये तुमची आई असते त्या घराचं त्या कुटुंबाचं नेतृत्व करत असते जर आपण घरांमध्ये ते नेतृत्व करू शकतो. बर  नेतृत्व म्हणजे नेहमी पुढे जाणं तावातावाने भांडण, लग्न ठरवणं किंवा जे मी म्हणून तेच झालं पाहिजे म्हणजे असा भाव म्हणजे नेतृत्व नाही. तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांची काय काळजी घेत आहात तुम्ही तुमची जबाबदारी आहे त्याची कशी काळजी घेत आहात, तुमचं कर्तव्य आहे त्याच्याप्रती तुम्ही किती निष्ठावंत आहात. याला खर नेतृत्व म्हणतात.© लेखामधील विचार मोक्षदा पाटील(I.P.S), पोलीस अधीक्षक, यांचे असून मी शब्दबद्ध केलेले आहे.

0 

Share


Avinash Salve
Written by
Avinash Salve

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad