Bluepad | Bluepad
Bluepad
" स " चे सप्तरंग
मर्मस्पर्शी जीवन
मर्मस्पर्शी जीवन
10th Jun, 2020

Share

सर्व वाचक मित्रांना माझा नमस्कार.आजचा लेख हा माझ्या व्यक्तिगत अनुभवाने तुमच्या समोर मांडत आहे. कोणत्या ही संगीत प्रकारामध्ये सा हा स्वर आपण पाहतो. सा पासून संगीत सप्तकाची जशी सुरुवात होते . त्याच प्रमाणे आपल्या जीवनाच्या सुर सप्तकाचा आरंभ हा " स" ने होतो. " स " हा शब्द दिसायला आता जरी एकटा दिसतं असेल. पण लेखाच्या समाप्तीला त्याची ताकद किती आहे ते तुम्ही जाणून घ्यालच ." स " या शब्दाकडे पाहण्याची नजर बदलावी, आणि त्याच मर्म समजून उमजून आमलात यावे म्हणून हा प्रयत्न .
मेघधनुष्य / इंद्रधनुष याची तुलना आपण दुस-या कोणत्याही नैसर्गिक चमत्काराशी करु शकत नाही . त्याचा प्रत्येक रंग त्याची खासियत दाखवून देतो, आपण पण एक इंद्रधनुष्या सारखे असतो विविध छटा नी बहरले लो. सुरेश भटाची एक कविता आहे . " रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा ". जर मित्रानो आपल्या जीवनात " स " नाही तर काहीच लाभ नाही. म्हणून आपल्या जीवनात सात प्रकारचे "स" नक्कीच हवेत .

पहिला " स " हा परमेश्वर कडून भेटला असावा बक्षिस म्हणून . तो म्हणजे स्वप्न मला खात्री आहे या पृथ्वी वर कोण असा नाही जो स्वप्न पाहत नाही . प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतातच. आणि ती पुर्ण करण्यासाठी पहिला " स " नेहमी आपल्याला इच्छा शक्ती देतो. स्वतः मधील हा पहिला " स "शोधा व त्याला जागे करा डोळे बंद करु स्वप्न पाहता येतात पण जागेपणी साकारावी लागतात. ही " स " ची पहिली पायरी .(येणा-या दिवसात स्वप्न या शब्दावरती एक वेगळा लेख सादर करेल )

दुसरा " स " हा स्वप्नपूर्ती साठी हवा असतो . त्याची आवश्यकता ही भासतेच, तो संयमाचा स आहे संयम असेल तर कोणतीही गोष्ट पुर्ण झाल्या वाचून राहत नाही. आयुष्यातील उथळ पण सोडून संयमा कडे वाटचाल करा.

तीसरा " स " हा आपल्याला ही जाणीव करुन देतो की स्वप्न साकार होत असताना, संयमी होवून तीस-या " स " चा स्वीकार करावा लागतो, आणि हा स स्पर्धाचा आहे . स्पार्धा असेल तरच एक जिद्द ठेवून आपण ध्येय प्राप्ती करतो.

चौथा स हा अगदी सोपा वाटत मात्र तो तितकाच अवघड आहे. सरळपण, या " स " चा आज काला वापर कमी आणि देखावा करुन टाकला आहे. स्वप्न साकार करण्यासाठी ( short cut ) हवा आहे . कोणाला सरळ सुटसुटीत मार्गाने काम करायच नाही. कुठून तरी वशीला भेटावा, ओळख निघावी पण जर सरळपण आपल्यात आहे . तर आपण माउंट एवरेस्ट पण पार करु शकतो किती ही संकट आली तरी दूर करुन.

पाचवा " स " हा सरळपणात येणारे संकट, आपत्ती, विरोध यांना पराभूत करण्या उपयोगी आहे तो म्हणजे सुसज्जता. सदैव तयार राहणे. बुध्दी, ज्ञान, आणि अनुभवाचे शस्त्र आपल्याला सुसज्ज ठेवायला हवीत. कारण हेच आपल्याला मदत करतात.

सहावा " स " हा जरा तुमच्या व्यक्तिगत विचारधारेवर अवलंबतो. तो आहे स्पष्टवक्ते असणे . कोणत्या ही समयी, प्रसंगी , तुम्हां आम्हांला हा स सोबत ठेवावाच लागेल. हा स हा एक धारदार तलवारी सारखा आहे कोणालाही सामोरे जाण्याची ताकद देणारा हा " स "

सातवा स हा आपल्याला हे दाखवतो की स्वप्न, संयम, स्पर्धा, सरळपण, सुसज्जता, स्पष्टवक्तेपण या साठी काही तरी हवं आहे. तो " स " आहे सोबती.. हा " स " आपले मित्र मंडळ, जवळचे स्नेही या साठी नाही आहे वरील सहा स पुर्णत्वास नेण्यास गरजेची ती सोबत. ही सोबत म्हणजे आई वडीलांचा आर्शिवाद, गुरूजन वर्गाचे मार्गदर्शक, थोरामोठ्याचा सल्ला, पुस्तके, ज्ञान, बुद्धीमत्ता, अनुभवाचे क्षण. याची शिदोरी सोबती म्हणून हवी . तरच आपण समृद्ध बनू शकतो.
हे सात " स " आपल्याला समृद्ध करु इच्छितात फक्त आपण त्यांना सोबती म्हणून साथीला घ्यायला हवे. लेखाच्या प्रारंभी एकटा असलेला हा " स " आता तुमची माझी ताकद ठरु शकतो....

आशा करतो हा लेख आवडला असेल. याचा दुसरा भाग जर वाचायला आवडेल तर नक्की प्रतिक्रिया (comments) मध्ये नमूद करा . येणा-या दिवसात अजून सात प्रकारचे " स " तुमच्या समोर सादर करेल .
" स " चे सप्तरंग
● लेखक : - शुभम ज्योती चव्हाण ●

12 

Share


मर्मस्पर्शी जीवन
Written by
मर्मस्पर्शी जीवन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad