Bluepad प्रतिसाद..लॉकडाऊनला
Bluepad

प्रतिसाद..लॉकडाऊनला

Rupal palande
Rupal palande
9th Jun, 2020

Share

बघता बघता आज लॉकडाऊनचे ७५दिवस उलटले.अनलॉक ०१ चीही सुरवात झाली.आज अनेक अटी शर्तीसह बाजारपेठ पुन्हा सुरू होईल,बेस्टसेवा पुन्हा सामान्यांच्या सेवेत रुजू होतील,खाजगी कचेऱ्या,उपहारगृहे ही सुरू होतील.थोडक्यात काय तर अनेक निर्बंध बाळगत आत्मनिर्भर भारताची सुरुवात तर झाली आहे.
पण या साऱ्याला भारतीय नागरिक कसा प्रतिसाद देत आहे हे ही पाहणं महत्वाचं ठरेल. आजही भारतात रुग्णांची संख्या वाढत आहे.आज भारतात २,४६,०००पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहेत. ४०,००,०००कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे . जर कोरोना चाचण्या व कोविड-१९ यांची सरासरी काढली तर ही बाब लक्षात घेता येते की भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण ५% इतके आहे .यातील ८०% लोकांमध्ये कोविड -१९ ची लक्षणे दिसून येतच नाही.सध्या भारताची लोकसंख्या ही १३०करोड आहे आणि सध्या सरकारची कार्यक्षमता पाहता या सर्वांची कोरोना चाचणी करणे कठीण आहे.काही तज्ञच्या मते जर ४०लाख लोकांपैकी जर ५% लोकांना कोविड १९ची लागण झाली असेल तर १३०करोड पैकीं आज पर्यंत जवळपास ५करोड लोकांना कोविड १९ होऊन बरा ही झाला असेल कारण चाचणी न झाल्यामुळे किंवा लक्षणे दिसत नसल्यामुळे त्यांच्या हे लक्षात ही आले नसेल.त्यामुळे लोक काम करायला नियमांचे योग्य पालन करत घराबाहेर पडतील का ? हा प्रश्न ऐरणीवरच आहेच .समाजात काही भागांमध्ये भीतीचे वातावरण तर काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्याची घाई दिसून येते .वाढती रुग्णसंख्या व लोकांचा अनलॉक ला प्रतिसाद ह्या आता चिंतेची बाबी बनत आहे.
जिथे एकीकडे अनलॉक लच्या पहिल्याच दिवशी मारिन ड्राईव्ह वरची गर्दी येणाऱ्या धोक्याचे चित्र दाखवत होती तिथेच डॉक्टर असून ही इस्पितळात जागा न मिळाल्याने त्यांचा होणार मृत्यू येणारी परिस्थिती किती दाहक असू शकते याची जाणीव करून देत आहे.आज इस्पितळात नक्की किती खाटा उपलब्ध आहेत यांची योग्य माहिती नसल्याने अनेकांना योग्य उपचार मिळत नाही आहे आणि अंततः उपचाराभवी त्यांना मृत्यू ओढवतो.हे सारे आणखी किती भयावह असू शकते हे वेगळे सांगण्याची गरज नाही .
हो ! आज खरी गरज आहे ती या लॉकडाऊनमुळे विस्कळित झालेलेल्या अर्थव्यवस्था सांभाळण्याची .आता म्हणाल जान हैं तो जहाँ! पण मला सांगा जर लॉकडाऊन नसता तर इतके लोक दरवर्षी अपघातात किंवा लहानसहान आजारामुळे मृत्युमुखी पडतातचं मग आपण तेव्हा ही घरी राहणं पसंत करतो का?ही मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था जर कोलमडली तर येणाऱ्या काळात कोविड१९ मुळे मरणाऱ्यापेक्षा उपासमारी किंवा बेरोजगारीमुळे मृत्युमुखी पडतील.येणारा काळ हा भारतासाठी आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. आपली अर्थव्यवस्था ही अधिक डळमळीत होऊन अनेक लोकांचे संसार उध्वस्त होण्याची शक्यता जास्त आहे.मग यावर उपाय काय? उपाय इतकाच की योग्य ती काळजी घेणं. योग्य प्रकारे घेतलेली काळजी आणि सरकारी नियमांचे पालन या मुळेच आपण पुन्हा कार्यशील होऊ शकतो. आता वेळ आहे खरी घरा बाहेर पडून नियमांचे योग्य पालन करत काम करण्याची , देशासाठी आपले योगदान देण्याची.

काळजी कशी घ्यावी?
मास्क लावूनच घराबाहेर पडा.
वेळोवेळी हात धुवा.
दोन हाताचे योग्य अंतर ठेवा.
भाज्या स्वच्छ धुवून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा.
जास्तीत जास्त वेळ घरी रहा.
बाहेरून आल्यावर अंगोळ करा.
प्रतिकारशक्ती वाढवेल असाच आहार घ्या.
बाहेरचे खाणे काही दिवस टाळा.
गरम पाणी प्या.

11 

Share


Rupal palande
Written by
Rupal palande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad