Bluepad | Bluepad
Bluepad
माझा फसलेला कला प्रवास!
A
Asha Bhide
9th Jun, 2020

Share

माझा फसलेला कला प्रवास असं म्हणतात जगात चौसष्ट कला प्रकार आहेत. तशा त्यातल्या मला चार पाच च कला माहित आहेत. ईयत्त्ता पाचवी मध्ये शेंडे बुवांच्या वर्गास जाऊन गाण्याची तालीम धेणे अनिवार्य च होते. त्यामुळे आपोआपच पहिल्या कलेचा परिचय झाला. पण कसल काय माझा भसाडा आवाज आणि सूर बेसूर . तरी बुवांना माझ्यावर सात वर्ष कष्ट धेणे भागच होत .कारण जसं विद्यार्थ्यांनी गाण्याच्या वर्गावर हजर रहाणे अनिवार्य होते तोच नियम शिक्षकांना ही लागू होता. आकरांवी नंतर मी शाळा सोडल्यामुळे माझ्या पासून बुवांची सुटका झाली. माझ्या कलाप्रवासातली एक कला बाद झाली. तशीच सात वर्षांची शिक्षा माझ्या चित्रकलेच्या गुरूंनीही भोगली . अहो एक रेष ओढावयाला येईल तर शपथ ! मी तर अशा काळात जन्मलेली होते की तेव्हा मुलींना रांगोळी काढायला यावीच लागत असे . तीही नाही जमली .मग काय दुसरी कला बाद . पण कला शिकायचा सोस काही थांबला नाही. महाविद्यालयात मिरज येथे शिक्षण सूरू झाले. आजोळी जान्हवी मामी सतार शिकत होती. मग काय मी आणि संजू दोघांनीही ती तालीम सूरू केली. गळा बेसूर म्हंटलं बोटातून तरी सूर निघतात का बघू. परंतु तिथेही मिराशी बुवांनी दोन वर्षा ची शिक्षा भोगली. म्हणजे तीसरी कला बाद झाली. मग माझी स्वारी क्रिडांगणा कडे वळली. तिथे तर पहिली ऊंच उडी घेतली आणि पायच मोडला. अशाप्रकारे चौथी कला बाद झाली. त्या नंतर नृत्य अभिनय वगैरे पुढील कलाप्रकार शिकून गुरूंना शिक्षा करायचं थांबवाव लागल . आणि अशा प्रकारे माझ्यातला कलाकार वारला. आणि मग एक रसिक जन्माला आला. साधारण १९७४/७५ च्या सुमारासच. मी किशोरी ताईंचा आहीर भैरव,भूप, पुरीया धनश्री ऐकले. ते ऐकून तर मी त्यांची वेडी भक्त झाले. इतकी ,की त्यानंतर मला दुसऱ्या कोणाचं गाणं आवडेनासे झाले. अनेक वर्षं ही माझी अवस्था होती. अतिशय चांगल्या चांगल्या गवयांची गाणीसुद्धा मला त्यापुढे अगदी रसहीन वाटायला लागली. इतकी मी ताईंच्या गायनाची भक्त झाले.

7 

Share


A
Written by
Asha Bhide

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad