Bluepadमारले जातीवादाने
Bluepad

मारले जातीवादाने
कविता वाचतो खेदाने...

कवी कबीरसेवक शरद गायकवाड
8th Jun, 2020

Share

काय गुन्हा केला भावाने
मारले मिळुन जातीवादाने
किती बळी घेणार ओळीने
दफ्तरी नोंद झालेली गुन्हायाने
मेलेल्या भावाने का मारता कारणाने
तरी जीवाचा आंकाताने वर्मी घावाने
निष्पाप मरु लागले दळभद्री राजकारणाने
निर्ढावलेले मन चिरत बातमीने
आता तरी जागे व्हा समाजाने
रोज रोज मारला जात काय केले लेकराने
आता गप्प का बसावे जाब विचारला पाहिजे
आम्ही चिरत आहे शस्त्राने न्याय पाहिजे
अरविंद बनसोड च्या हत्येला उत्तर पाहिजे
तुमच्या शासन काळात सुरक्षा संरक्षण पाहिजे
गांडुचा धिक्कार केला पाहिजे
मारला जातो जीव तिथे कायद्याचा वचक पाहिजे
अन्यायाविरुद्ध पेटून आता लढले पाहिजे
गुहेत बसलेल्या चित्ता वाघ सिंह खवळले पाहिजे
अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे
शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यात अर्थ नाही
एक दिवस वाघा सारखे जगलेच पाहिजे
मरून मरणार आहे मातीच होणार आहे
रक्तातील मातीचा लढून गुलाल उधळणार आहे
काल पर्यंत मी बुध्द शांत पाहिला आहे
कांतीकारक कबीर विद्रोही भिमा ने दिला आहे
अरविंद बनसोड किती निवेदनात दडपणार आहे आंदोलन निषेध मोर्चात न्याय कधी देणार आहे
सांग शरद कितवी यादी हत्येची नबंराची सामाजिक न्याय मंत्रालय माहितीची
कागदपत्रे दस्त पुरावे चौकशी हत्येची
जीव गेल्यावर प्रतिक्षा फक्त निकाल न्यायाची
चीड का येत नाही अन्यायाची
लढाई फक्त वाटस आप फेसबुक ची...


7 

Share


Written by
कवी कबीरसेवक शरद गायकवाड

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad