Bluepad | Bluepad
Bluepad
हे कोरोनाकारा....

प्रमिला प्रभु
प्रमिला प्रभु
8th Jun, 2020

Share


हे कोरोनाकारा....

हे कोरोनाकरा...


to be or not to be that is the question
to be or not to be that is the question

जगावं की मरावं हा एकच सवाल आहे...

या दुनियेच्या महा संकटात कोरोना बाधिताचा भाग होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं? का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?

आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने? माझा तुझा याचा अन त्याचाही

कोरोनाच्या विषाणूने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा ..कधीही...

पण मग...
पण मग त्या निद्रेनंतर मृत्युला कवटाळणाऱ्याला पाहण्याची ही संधी नसेल अगदी रक्ताच्या नात्यालाही म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागेपण...

सहन करतो प्रेताच्या निर्जीव पणाने शहरांच्या अभिमानावर होणारे बलात्कार...

नागरिकत्वाच्या गाभार्‍यात असणाऱ्या माणुसकीची विटंबना...

आणि अखेर जिवंतपणाचा आव आणून उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या दाराशी.

विधात्या ....तू इतका कठोर का झालास?

एका बाजूला आमचे गावकरीही आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू हि आम्हाला विसरतोस.

पण मग वाढलेल्या केसेसचे हे आकडे घेऊन हे कोरोनाकारा....
आम्ही मुंबईकरांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं ?   कोणाच्या पायावर?   कोणाच्या ??    कोणाच्या???


कुणी लस देता का लस?
एका विषाणूला कोणी लस देता का?
एक विषाणू लसी वाचून, शिंकण्यातून, खोकल्यातून, माणसांमधील भीतीतून , देवाच्या भीतीवाचून  शहराशहरात हिंडतोय.
जिथून प्रसार संपणार नाही अशी एक जागा धुंडतोय .

कुणी लस देता का लस?

घाबरायचे नाही...
घाबरायचे नाही...
घाबरून काय फायदा आहे ..आणि थकायचे सुद्धा नाही.
माझ्यासमोर पेशंट वाढत चालले ना.. मग मी अंतर पाळून साखळी तोडून टाकीन, पण या विषाणू समोर हार पत्करणार नाही.

- प्रमिला प्रभू

14 

Share


प्रमिला प्रभु
Written by
प्रमिला प्रभु

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad